उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर असून  त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
      गुरुवार, दि. 12 सप्टेंबर रोजी  सकाळी 6-50 वा. सोलापूरहून अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण.  स. 8 वा. अणदूर येथे आगमन, राखीव व मुक्काम. शुक्रवार, दि. 13 रोजी स. 10 वा. अणदूरहून  तुळजापूरकडे प्रयाण, स. 10-30 वा. तुळजापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृहात राखीव व मुक्काम. सोईनुसार तुळजापूर येथून अणदूरकडे प्रयाण. आगमन, राखीव व मुक्काम.
         शनिवार, दि. 14 रोजी स. 7-40 वा. अणूदर येथून मौ. मुर्टा, ता. तुळजापूरकडे प्रयाण, स. 8 वा. मुर्टा येथे आगमन व महिला शेतकरी अभ्यासगट सहल कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ-मुर्टा, स. 8-30 वा. मुर्टाहून अणदूरकडे प्रयाण. स. 8-50 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. स. 11 वा. अणदूरहून तुळजापूरकडे प्रयाण, स. 11-30 वा.  तुळजापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, तुळजापूर  येथे राखीव. दु. 1 वा. वडार समाज मेळाव्यास उपस्थिती,  स्थळ- शारदा मंगल कार्यालय, उस्मानाबाद रोड, तुळजापूर, दु. 2 ते 5-15 पर्यंत शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे राखीव.  सायं.5-15 वा. तुळजापूरहून सिंदफळ, ता. तुळजापूरकडे प्रयाण,  सायं.5-30 वा. सिंदफळ येथे आगमन व श्रीच्या आरतीस उपस्थिती. सायं. 6 वा. सिंदफळ येथून अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण, सायं 6-30 वा. अणदूर येथे आगमन राखीव व मुक्काम.
     रविवार, दि. 15 रोजी स. 9-15 वा. अणदूरहून चिकुंद्रा, ता. तुळजापूरकडे प्रयाण, स.9-30 वा. चिकुंद्रा येथे आगमन व कै. देवराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ, चिकुंद्रा संचलित शाळेच्या नवीन इमारतीच्या उदघाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- चिकुंद्रा, स. 10-30 वा. चिकुंद्रा येथून तुळजापूरकडे प्रयाण, स. 11-15 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव.  दु.12-05 वा. जवाहर गणेश मिरवणूक कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जवाहर गणेश मंडळ, तुळजापूर, दु. 1 ते 3-30 पर्यंत शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे राखीव.  दु.3-30 वा. तुळजापूरहून पांगरधरवाडीकडे प्रयाण, दु 4 वा. पांगरधरवाडी येथे आगमन व श्रीच्या आरतीस उपस्थिती, स्थळ- पांगरधरवाडी, ता. तुळजापूर,  सायं. 5 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सायं 7 वा. श्रीच्या आरतीस उपस्थिती, स्थळ- अंबिका तरुण मंडळ कमान वेस, तुळजापूर, सायं. 7-30 वा. श्रीच्या आरतीस उपस्थिती स्थळ- भोला तरुण मंडळ, राणी लक्ष्मीबाई उद्यानाजवळ ,तुळजापूर, रात्री 8 वा. श्रीच्या आरतीस उपस्थिती, स्थळ-जय महाराष्ट्र मंडळ, तुळजापूर  व  सोईनुसार तुळजापूरहून अणदूरकडे प्रयाण, राखीव व मुक्काम. 
 
Top