नळदुर्ग -: येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालय येथे मंगळवार दि. 3 सप्टेंबर रोजी आंतरमहाविदयालयीन क्रॉस कंट्री रेसचे (मुलांसाठी 12 किमी व मुलीसाठी 6 किमी) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद जिल्हयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद संलग्न महाविदयालयातील तीनशे मुले-मुली सहभागी होणार आहेत. तरी या स्पर्धेत विदयापीठाशी संलग्न असलेल्या महाविदयालयातील खेळाडुनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. पेशवे व क्रिडा शिक्षक प्रा. शाहुराज घोरपडे, प्रा. कपील सोनटक्के यांनी केले आहे.
 
Top