नळदुर्ग -: वागदरी (ता. तुळजापूर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विदयार्थ्यांच्या चावडी वाचन कार्यक्रमास येथील विदयार्थी, पालक व ग्रामस्थातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शासनाच्या या अभिनव उपक्रमाबाबत पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
    विदयार्थी, पालक व शिक्षक यांचा योग्य तो समन्वय साधला जावा, दिवसेंदिवस विदयार्थ्यांमध्ये होणा-या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष पालक व शिक्षक याना घेता यावा, विदयार्थ्यांमध्ये चार चौघात उभे राहून वाचनाचे धाडस निर्माण व्हावे, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता दुसरी ते चौथी इयत्तेतील शालेय विदयार्थ्यांचे सामुहिकरित्या चावडी वाचन कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी घेण्याचा आदेश शासनाच्या शिक्षक विभागाने काढला असून या आदेशला प्रतिसाद देत जि.प. प्राथमिक शाळा वागदरीचे मुख्याध्यापक प्रकाश मोकाशे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विदयार्थ्यांच्या चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजकुमार पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मिनाक्षी सुरवसे, सदस्य एस.के. गायकवाड, किशोर धुमाळ, पंडीत पाटील, सुखसिंग ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी शालेय विदयार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे वाचन केले.
 
Top