उस्मानाबाद -: तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तुळ) येथेील सुरेश दशरथ ढेपे (वय 30 वर्ष ) हा इसम घरात कोणास काहीही न सांगता निघुन गेला आहे. सदर इसम रंगाने गोरा, अंगाने -मध्यम, उंची -5 फुट, चेहरा- सरळ गोल, केस-काळे लाल,अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. या इसमाबाबत कुणास काही माहिती असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन,तुळजापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.