उस्मानाबाद :- माहे फेब्रुवारी/मार्च,2014 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पारीक्षा ( इ. 10) वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12) वी परीक्षेला खाजगी विद्यार्थ्यांनी थेट अर्ज योजनेअंतर्गत फॉर्म नंबर 17 मध्ये अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र दि. 31 ऑक्टोंबर 2013 पर्यत पाठवावे असे आवाहन सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी केले आहे. खाजगीरीत्या प्रविष्ठ होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबधित विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी केले आहे.