उस्मानाबाद :- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उस्मानाबादअंतर्गत  स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरीष्ठ लिपीक, वाहन चालक व शिपाई या पदाची भरती करण्यात येणार आहे. वरील पदे एकत्रित वेतनावर/ मानधनावर सहा महिन्याच्या करार पध्दतीवर  भरण्यात येणार आहे.
    या पदासाठी आवश्यक अर्हता, पदाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, अर्जाचा नमुना व इतर माहिती जिल्ह्याच्या  www.Osmanabad.nic.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 27 सप्टेंबरपर्यंत मा. कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जिल्हा परिषद शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे शहर पोलीस स्टेशनशेजारी, उस्मानाबादशी संपर्क साधावा. असे आवाहन अध्यक्ष निवड समिती तथा अधीक्षक अभियंता (प्रमंग्रासयो) महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद आणि सदस्य सचिव निवड समिती तथा कार्यकारी (प्रमंग्रासयो) महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास  संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top