उस्मानाबाद :- महिला व बाल विकास विभाग आणि आयआयटीयन्स पेसच्या संयुक्त विद्यमाने मार्च,2013 मध्ये इयत्ता 10 वीची परीक्षा दिलेल्या व इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या, घेतलेल्या विद्यार्थीनींची आयआयटी/जी इंटरनॅशनल ऑलिंपियाड व तत्सव अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेची पुर्वतयारी करुन घेण्यात येणार आहे. इच्छुक मुलींनी 5 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवीण त्यागी, व्यवस्थापकीय संचालक, आयआयटीयन्स पेस, एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड, 4 था माळा, शॉपर्स पॉईंट एस. व्ही. रोड, अंधेरी पश्चिम मुंबई- 4000 58 या पत्यावर अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात महिला व बालविकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 022-61779777 किंवा ingo@iitianspace.com किंवा www.iitianspace.com या वेबसाईटला भेट दयावी, असे आयुक्त, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी 022-61779777 किंवा ingo@iitianspace.com किंवा www.iitianspace.com या वेबसाईटला भेट दयावी, असे आयुक्त, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांनी कळविले आहे.