उस्मानाबाद :- नागरी हक्क संरक्षण कायदा व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दिनांक 1 एप्रिल ते 31 आगस्ट या कालावधीत जिल्ह्यात 13 गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आली.
         जिल्हाधिकारी डा. के.एम. नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली आज दक्षता समितीची बैठक पार पडली. त्यावेळी जिल्ह्यातील नागरी हक्क संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, जिल्हा सरकारी वकील व्ही.बी. शिंदे, सहायक संचालक, सरकारी अभियोक्ता एस.पी.चव्हाण, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अनिल शेंदारकर यांची यावेळी उपस्थिती होती.
        या बैठकीत दि. 1 एप्रिल 1995 ते 31 आगस्ट, 2013 पर्यंत घडलेल्या  एकूण गुन्ह्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर पोलीस तपासावरील गुन्हे, पोलीस तपासावरील प्रलंबित गुन्हे, मासिक गुन्ह्यांची माहिती, गुन्ह्यातील अत्याचार पीडितांना देण्यात आलेल्या आर्थिक साहाय्याबाबतची माहिती आणि अर्थ साह्यासाठी प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची माहिती आदींचा आढावा घेण्यात आला. 
 
Top