उस्मानाबाद -: शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांकडे प्रलंबित असणरी प्रकरणे तातडीने मार्गी लावून संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळेल यादृष्टीने कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डा. के.एम. नागरगोजे यांनी कृषी विभागाला दिल्या.
        येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेतकरी जनता अपघात विमा योजनेची आढावा बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची यावेळी उपस्थिती होती.
       या योजनेसाठी  सन 2012-2013 या वर्षात विमा कंपनीकडे 90 प्रस्ताव पाठविण्यात आले. त्यापैकी 42 प्रस्ताव मंजूर करुन 13 प्रस्ताव कंपनीने नामंजूर केले. सध्या कंपनीकडे 35 प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती तोटावार यांनी दिली. यावर प्रलंबित प्रकरणी पाठपुरावा करण्याचे निर्देश डॉ. नागरगोजे यांनी दिले. या बैठकीस विमा कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 
 
Top