उस्मानाबाद -: लोकशाही दिनात येणाऱ्या तक्रारींवर विहित मुदतीत संबंधित शासकीय विभागांनी कार्यवाही करावी. सर्वसामान्य नागरिकांच्या योग्य त्या कामांना प्रशासकीय बाबींमुळे दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्या, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॅा. के. एम. नागरगोजे यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन उपक्रम झाला. त्यावेळी त्यांनी सर्वच विभागप्रमुखांना याबाबत कार्यवाहीची सुचना केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर यांच्यासह विविध विभागप्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
लोकशाही दिनाचे स्वरुप आता बदलले आहे. आता तालुकास्तरावरही लोकशाही दिन होत आहे. त्यामुळे नागरिकांनी तेथील तहसील कार्यालयात आपल्या तक्रारी द्याव्यात. जिल्हास्तरावरील तक्रार असेल तरच ती जिल्हास्तरीय लोकशाही दिनात मांडावी. प्रत्येक स्तरावरील लोकशाहीदिनापूर्वी 15 दिवस अगोदर विहित नमुन्यातील तक्रार अर्ज देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.