नळदुर्ग -: सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच काँग्रेस पक्षाने विकासात्मक बाबीला प्रथम प्राधान्य दिले आहे. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील वाडी, वस्तीवर वास्तव्य करणा-या ग्रामस्थांसह तळागाळापर्यंत शासकीय लोककल्याणकारी विविध योजना व काँग्रेसने केलेल्या विकासात्मक कामाची माहिती पोहचविण्याचे आवाहन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी शनिवार रोजी आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले.
नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्यासमोर असलेल्या मधुरजल इमारतीच्या प्रांगणात काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील हे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष इमाम शेख यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले. यावेळी बोलताना इमाम शेख म्हणाले की, आपण मूळचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून काही काळ रस्ता चुकलो होतो. यापुढे काँग्रेस पक्षाचे कार्य करुन सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा विदयमान नगरसेवक शहबाज काझी हे बोलताना म्हणाले की, लवकरच काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादीसह अन्य पक्षाचे असंख्य कार्यकर्ते जाहीर प्रवेश करणार असून याबाबत नळदुर्ग शहरात मोठया भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर निवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार डुकरे, आप्पासाहेब पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील चव्हाण, नगराध्यक्ष शब्बीरअली सय्यद सावकार, उपनगराध्यक्षा सौ. अपर्णाताई बेडगे, माजी नगराध्यक्ष नितीन कासार, नगरसेवक शहबाज काझी, अमृत पुदाले, माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड, श्रीमती अर्चना डुकरे, सौ. सुभद्रा मुळे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष बसवराज धरणे, काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय दळवी, काँग्रेस सेवा दल नळदुर्ग शहराध्यक्ष विनायक अहंकारी, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समदानी कुरेशी, ॲड. अरविंद बेडगे, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, माजी पंचायत समिती सभापती बालाजी मोकाशे, उपसरपंच संगाप्पा हागलगुंडे, माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे, सुभाष कोरे, अख्तर काझी, प्रा. जावेद काझी, रणजित राठोड, सुधीर हजारे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनायक अहंकारी यांनी मानले.