उस्मानाबाद -: क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या क्रीडा धोरण 2012 अंतर्गत क्रीडा विभागाचे सक्षमीकरण या योजनेअंतर्गत तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्रावर क्रीडा मार्गदर्शकांची पदे भरणे शासनाच्या विचारधीन आहे , असे आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांनी कळविले आहे. या करिता क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य करु इच्छिणा-या खेळाडूनी आपल्या खेळाचा मागील पाच वर्षातील राज्य/ राष्ट्रीय/ आंतराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा तपशील तसेच त्यांच्याद्वारे इतर खेळाडूना प्रशिक्षण दिले जात असल्यास त्याबाबतची माहिती, अर्हतेच्या कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्जासह दि.15 सप्टेंबर,2013 पर्यंत या कार्यालयाकडे सादर करावी. विहिती नमुन्यातील अर्जासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी स्टेडीयम, उस्मानाबाद येथे कायालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे