उस्मानाबाद -: जिल्हयातील सर्व शाळा/ महाविद्यालयाचे प्राचार्य/ क्रीडा/ खेळाडू यांना कळविण्यात येते की, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद द्वारा सन 2012-13 या वर्षातील जिल्हास्तरीय शालेय ज्यदो 14, 17, व 19 वर्षाखालील मुले/ मुली स्पर्धचे आयोजन 25 ते 26 सप्टेंबर,2013 रोजी करण्यात येणार होते. परंतू तांत्रिक कारणामुळे सदरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि.11 सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद येथे करण्यात आलेले आहे. या बदलाची नोंद घेवून आपले संघ वेळेवर उपस्थित ठेवावे असे आवाहन राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा प्रमुख संदीप वांजळे यांनी केले आहे.  
 
Top