उस्मानाबाद :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्यामार्फत सन 2013-14 या वर्षातील उस्मानाबाद जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटींग, रोलर हॉकी व तायक्वांदो या क्रीडा स्पर्धांचे आयोजन तसेच जिल्हा धनुर्विद्या संघटना उस्मानाबाद यांच्या सहकार्याने खुल्या गटाच्या धनुविद्या क्रीडा स्पर्धंचे आयोजन 17 सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी स्टेडीयम, उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे. तरी यांची नोंद घेवून जास्ती जास्त शाळा/ महाविद्यालयांनी या स्पर्धामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे