उस्मानाबाद -: सर्व संबंधीत लाभार्थीना सुचित करण्यात येते की, मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कार्यबल समितीसमोर लाभार्थीच्या मुलाखती घेवूनच पात्र कर्ज प्रस्ताव बँकेस शिफारस करण्यात येतील.
    महाराष्ट् राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ (पिवळा फॉर्म भरलेले) दि. 10,11,13,व 16 सप्टेंबर 2013, जिल्हा उद्योग केंद्र (निळा फॉर्म भरलेले) दि.18,19,20,व 21 सप्टेंबर 2013, केव्हीआयसी (पांढरा फॉर्म भरलेले ) दि.21 सप्टेंबर 2013.
      जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय, सेन्ट्रल बिल्डींग समोर, उस्मानाबाद येथे  सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येतील.    लाभार्थींना स्वतंत्र पत्र पाठविण्यात आली असून ज्यांना पत्र मिळाले नसतील त्यांनी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.के.व्ही.आय.सी.साठी गिरी - मो. नं. 8421525921, जिल्हा उद्योग केंद्रासाठी आर.बी.गायकवाड मो. नं. 9421942957, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळासाठी  खेडकर ए.के. मो.नं. 9011091531  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाव्यवस्थापक तथा सदस्य सचिव जिल्हा कार्यबल समिती, उस्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top