उस्मानाबाद -: कृषि विभागाची वर्ग ड शिपाई / पहारेकरी आणि रोपमळा सहाय्यक या पदासाठी मुलाखत सोमवार,दि. 16 सप्टेंबर 2013 रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद येथे घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र पाठविण्यात आले आहे. ज्या पात्र उमेदवारांना अद्याप प्रवेश पत्र प्राप्त झाले नाही अशा उमेदवारांनी दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद या कार्यालयातून ओळखीचा पुरावा सादर करुन प्रवेश पत्र घेवून जाण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.