बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : ढाळे पिंपळगाव (ता. बार्शी) मध्यम प्रकल्पात प्रथमच शंभर टक्के क्षमतेने भरल्याने शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास बार्शी तालुक्यातील महागाव, कळंबवाडी, बावी, ढाळे पिंपळगाव आदी गावच्या ग्रामस्थांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. दिलीप सोपल यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नागेश अक्कलकोटे, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र नूवरे, विवेकानंद डोईफोडे, पोपट आगलावे, नागनाथ आगलावे, उत्तम घोलप, हनुमंत जाधव, गुणवंत मुंढे, बाळासाहेब पिसाळ आदि पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढाळे पिंपळगाव प्रकल्प हा पालकमंत्री ना. सोपल यांच्याच संकल्पनेतून तयार झाला. सन १९८६ साली सोपल यांच्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये या प्रकल्पाला प्रशासकिय मंजूरी मिळाली. मध्यंतरी निधी अभावी काम रखडल्याने एल.आय.सी. कंपनीकडून सदरच्या प्रकल्पासाठी कर्ज घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यात यावा असा विचार राज्य मंत्री मंडळात मांडून या प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले. सन २००४ साली हा प्रकल्प पूर्ण झाला. काम पूर्ण झाल्यानंतर पावसाचे चांगले वातावरण झाल्याने आज प्रथमच हा प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरल्या. पाणी पाहून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सदरच्या प्रकल्पाची ५५० एम.सी.एफ.टी क्षमता आहे. या प्रकल्पाच्या जवळ असलेल्या गोरफाळे, ममदापूर येथील लघु प्रकल्पही पूर्णपणे भरले आहेत.
बार्शी तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी योजना कार्यान्वित करुन कायमस्वरुपी प्रश्न निकाली काढल्यानंतर सोपल यांनी जनावरांच्या पिण्याचा व शेतीचा प्रश्न सोडविण्यासाठी मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, विविध तलाव तसेच उपसा सिंचन योजनांसाठी विशेष प्रयत्न करुन बार्शी तालुक्याचा कायमस्वरुपी दुष्काळ घालविण्याचा प्रयत्न केला आहे.