बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सहाय्यक दुय्यम निबंधक एम.बी. बलदोटा सह सहा जणांनी संगणमताने तोतयागिरी करुन जमीनीचे बनावट कागदगत्रे तयार करुन फसवणूक केल्याची तक्रार फसवणूक झालेल्या महिलेने बार्शी पोलिसांत दिली. सौ. सुलभा परिचारक असे त्या ङ्कहिलेचे नाव असून सदरच्या तक्रारीवरुन ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला परंतु ६ दिवसानंतरही यातील आरोपी मोकाटच असल्याने तपासाबाबत उलटसुटल चर्चा सुरु आहे.
    सदरच्या गुन्ह्यातील आरोपी बलदोटा हे बार्शी शहरात नोकरीला असतांना प्रत्येक खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठ्या रकमा घेतल्याशिवाय सह्या करत नव्हते व त्यांना हवी तेवढी रक्कम मिळाल्यावर पाहिजे त्या कागदपत्रावर सह्या करुन मोठ्या प्रमाणात माया जमविल्याने त्यांच्याकडील असलेल्यास स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करावी असा सूर जनतेतून येत आहे. त्यांनी आपल्या कार्यालयात काही दलालांची नेमणूक केली होती व त्यांच्यामार्फत ते आपली रक्कम स्विकारत होते, दररोजच्या व्यवहारात किमान एक लाख रुपये तरी त्यांची वर कमाई होती व सदरची रक्कम आपण वरिष्ठांना देत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते असेही नागरिकांतून बोलले जात आहे.
 
Top