उस्मानाबाद :- निवडणुकीचे काम करताना प्रत्येक अधिका-यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची नोंदणी, छायाचित्रासहित मतदार यादी आदी बाबी विहीत वेळेत पार पाडा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय आज दोन दिवसीय विधानसभा मतदारसंघ स्तरीय मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. नागरगोजे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस. चाकूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यासह या प्रशिक्षणात सर्व उपजिल्हाधिकारी, चारही विभागांचे उपविभागीय अधिकारी, आठही तालुक्यांचे तहसीलदार, नायब तहसीलदार व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हास्तरीय उपअभियंते, बांधकाम विभागाचे उपअभियंते यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. नागरगोजे म्हणाले की, आता प्रशासनाची ही निवडणूकपूर्व तयारी आहे. मतदार नोंदणी झाल्यानंतर त्याची तपासणी करुन प्रारुप यादी आपण जाहीर केली आहे. छायाचित्र पुनरिक्षण कार्यक्रम आपण जाहीर केला आहे. याचबरोबर 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या कोणत्याही नागरिकास मतदार म्हणून नोंद करता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी चाकूरकर यांनी मतदान प्रक्रियेसंदर्भात भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचना आणि निर्देशांचे तपशीलवार वाचन करुन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी कायदा 1950 , मतदार नोंदणी नियम 1960 आदी बाबींचीही माहिती दिली.