बार्शी - कॉमर्स ही शाख  इतर शाखांप्रमाणे दर्जेदार आणि जीवनाला कलाटणी देणारी शाखा असून यामध्‍ये  मोठ्या प्रमाणात नोकरी व स्वयं-रोजगाराच्‍या  संधी उपलब्ध आहेत .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी  मनामध्‍ये कुठल्याच प्रकारचे न्यूनगंड न बाळगत सहभागी झाल्‍यास   ते नक्कीच यशस्वी होतील ,  असा युवा संघर्ष व  कदम अॅकाऊट क्लासेस ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तज्ञांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
    यावेळी  व्यासपीठावर  कदम क्लासेस चे संस्थापक कदम  ,प्रमुख पाहुणे विनय संघवी ,पोलिस सब इन्स्पेक्टर सुरेख धस आणि युवा संघर्ष चे अध्यक्ष  अॅड .गणेश चव्हाण हे  उपस्थित  होते .
          ५ कोटी गुंतवणूक असणा-या  प्रत्येक कंपनी मध्ये सी.एस ची जागा भरणा आवश्यक असत. कंपनी कायदा २०१३ नुसार कंपनी सेक्रेटरी हे पद भरणे आवश्यक आहे.तसेच देशात फक्त ३१हजार  सी.एस आहेत .पण आताच गरजेनुसार त्याची गरज  लाखोत आहे ,असे मत अमोध महाजन यांनी व्यक्त केल.
          कुठल्याहि  शाखेचा १२ वी किंवा पदवीधर विध्यार्थी हा या कोर्सला प्रवेश घेवू शकतो तसेच घरी बसल्या याचा विध्यर्थी अभ्यास करू शकतो असे कौस्तुभ मराठे यानी सांगितले.
            सी ए साठी जिद्द आणि  अथक परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश तुमचा पदरात आहे तसेच सी एं चा काम हे ऑफिस मधेच असल्याने मुलींनी पण यात  मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.असे श्रद्धा काबरा या म्हटल्या . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश जगदाळे  रोहन घानेगावकर ,मुकेश रंगुडे.अतिश पाटील हकीब काझी हेमंत रंगुडे यांनी परिश्रम घेतले.
 
Top