नळदुर्ग -   श्री. तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना  हा  १८ ते २५ वर्ष दिर्घ  मुदतीवर  भाडेतत्‍वावर देवुन भाडेपोटी मिळणा-या रक्‍कमेतुन  बॅकेचे एकरक्‍कमी 19कोटी 50लाख रूपये  भरण्‍याचे प्रस्‍ताव बॅकेकडे दिले असुन शेतकरी व कामगारांच्‍या  हि‍तासाठी हा निणर्य घेतल्‍याचे श्री तुळजा भवानी साखर कारखान्याचे चेअरमन त‍थ माजी आ. नरेंद्र बोरगावकर यांनी कारखान्याची ३0 वी सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले .
   या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी  माजी आमदार  सि. ना.आलुरे गुरुजी,तर  कारखान्याचे व्‍हा.चेअरमन  सुनील चव्हाण, संचालक , अमर मगर, नेताजी पाटील ,महादेवप्पा आलुरे, प्रकाश चौगुले, शहबाज काजी, मुकुंद डोंगरे, गोकूळ शिंदे खंडू उंबरे, नवृत्ती माळी, लक्ष्मण वाघमारे, दिगंबर खराडे, सिद्रामप्पा मुळे, राजशेखर वडणे, राजकुमार पाटील, अशोक पाटील, बालाजी मोकाशे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सि. ना. आलुरे गुरुजी म्हणाले की, कारखाना का बंद पडला, याचा विचार न करता, यापुढे कारखाना चालविणार्‍यांना कर्मचारी व व्यवस्थापनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे सांगितले.
कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी अहवाल वाचन केले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कारखान्याला वाचविण्यासाठी म्हणून लिक्वीडेशन मध्ये न काढता भाडेतत्वावर देण्यात आले. यापूर्वी लोकमंगल उद्योगसमूह व दृष्टी शुगर्स आणि डिस्ट्रीलरीजने मध्येच करार मोडला.
 
Top