उस्मानाबाद -: युवकांच्या आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या सामाजिक उपक्रम शीलतेला प्रोत्साहन आणि चांगल्या प्रयत्नांना बळ देण्याचा उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काढले.
      येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित शिस्तबद्ध श्री गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा - 2012 चा पारितोषिक स्पर्धा  आणि उत्कृष्ट पोलीस तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जि.प.चे अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, पत्रकार संघाचे सरचिटणीस रवींद्र केसकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत आडसूळ हे होते.
     पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रात अनेक जण चांगले काम करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्याचे आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळणार आहे. मात्र, गणेश मंडळांनी रोषणाईबरोबरच व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन यासारख्या सामाजिक विषयांबाबत जनजागृती करण्याचे काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गणेश मंडळांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी असणारी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम या मंडळांनी करावे, असे ते म्हणाले. गणेश उत्सवाचे स्वरुप चांगले राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
       आ. राजेनिंबाळकर यांनी पत्रकार संघाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संघाच्या पदाधिकारी व सभासदांना धन्यवाद दिले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी  सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वर्गणीतला काही वाटा गरजू विद्यार्थी, नागरिक यांच्यासाठी राखीव ठेवावा आणि डाल्बीसारख्या आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या साधनांचा वापर टाळावा, असे आवाहन केले.  पोलीसांना एक सजग व जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी मदत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
         आ. पाटील यांनी गणेश मंडळाच्या माध्यमातून सलग वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना पारितोषिक देण्याची पत्रकार संघाला सूचना केली आणि पुढील वर्षीपासून दरवर्षी  या पुरस्कारासाठी 25 हजार रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून पुढील वर्षीपासून अनुक्रमे प्रत्येकी 10 हजार, 7 हजार, 5 हजार आणि 3 तीन हजार असे चार पारितोषिके देण्याची घोषणा पत्रकार संघाच्या वतीने रविंद्र केसकर यांनी केली.
      कार्यक्रमाच्या सुरुवातीला ही पारितोषिके प्रायोजित करणाऱ्या नंदकिशोर मंत्री व संजय मंत्री, राघवेंद्र बोधले, महेश पोतदार, डॉ. सचिन देशमुख, अनंत आडसूळ, राज ढवळे या  मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार महेश पोतदार, देविदास पाठक आणि हुंकार बनसोडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या प्रा. मिलींद माने, प्रा. प्रशांत चौधरी, प्रा एस. व्ही. जोशी, प्रा. ए. आर. गोरे, प्रा. व्ही. व्ही. वायचळ यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
          अध्यक्षीय भाषणात अडसूळ यांनी  पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. प्रास्ताविकात उपाध्यक्ष विशाल सोनटक्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पोतदार, चंद्रसेन देशमुख, देवीदास पाठक, रवींद्र केसकर यांनी केले. बालाजी निरफळ, सयाजी शेळके, रणजीत दुरुगकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.          
 
शिस्तबद्ध गणशोत्सव मिरवणूक स्पर्धा-2012 पारितोषिक विजेते-
स्व. हिराबाई नंदकिशेार मंत्री यांच्या स्मरणार्थ संजय मंत्री यांचेकडून  प्रथम (विभागून) - 1. बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली,उस्मानाबाद . 2. माऊली तरुण गणेश मंडळ, माऊली चौक, उस्मानाबाद यांना प्रत्येकी 5 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र. 
    डॉ. सचिन देशमुख यांचेकडून   व्दितीय (विभागून) - शिवाजी तरुण गणेश मंडळ, निंबाळकर गल्ली, उस्मानाबादव श्रीकृष्ण गणेश मंडळ, गवळीवाडा, उस्मानाबाद.
कै. सुभाष पोतदार  यांच्या स्मरणार्थ  पत्रकार महेश पोतदार यांचेकडून तृतीय  - कै. विलासदादा शिंदे गणेश मंडळ कोट गल्ली, उस्मानाबाद .
स्व. रसिकाबाई आडसुळ यांच्या स्मरणार्थ पत्रकार अनंत आडसुळ यांचेकडून उत्तेजनार्थ - सम्राट गणेश मंडळ, सावरकर चौक, उस्मानाबाद, स्व. धनंजय बोधले यांच्या स्मरणार्थ ॲड. राघवेंद्र बोधले यांचेकडून शिव ओडियाराज गणेश मंडळ, शिवाजी चौक, उस्मानाबाद. स्व. शंकरराव ढवळे यांच्या स्मरणार्थ राज डिजिटल यांचेकडून रणसम्राट गणेश मंडळ तांबरी विभाग, उस्मानाबाद .
   
उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
       शिराळा (ता. परंडा) येथे 24 मार्च 2013 रोजी घडलेल्या खून प्रकरणाचा यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा एम. डी. गुंडीले तसेच  पोलीस उपनिरीक्षक एस.टी. वाघमोडे, पोलीस नाईक एन. बी. राऊत, पोलीस कान्स्टेबल आर. व्ही. शिंदे (सर्व पोलीस ठाणे परंडा).
       येडशी येथील 30 मार्च 2013 रोजी घडलेल्या खून प्रकरणाचा यशस्वी छडा लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक एफ. एस. पाटील, पोलीस होड कान्स्टेबल एस. बी. निरगुडे, पोलीस नाईक जे. एन. गुंड आणि पोलीस हेड डकान्स्टेबल व्ही. जी. काझी (ग्रामीण पोलीस ठाणे, उस्मानाबाद).
     रांजणी कारखाना परिसरात झालेल्या खूनप्रकरणी गुन्ह्याचा छडा लावणारे सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. कोकणे, पोलीस नाईक महेश घुगे, (सर्व पोलीस ठाणे शिराढोण).
 
Top