नाशिक - ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अल्पसंख्याकांना आमिषे दाखवायची आणि मतांचे राजकारण करायचे हा कॉँग्रेसचा जुनाच फंडा आहे. त्यात नवीन असे काहीही नाही. समाज आज त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. कॉँग्रेस म्हणजे पत गेलेल्यांचा पक्ष आहे’, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉँग्रेसचा समाचार घेतला.
राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राज म्हणाले की, कॉँग्रेसवर पक्ष केवळ मते टिकवण्यासाठी अल्पसंख्याक समाजाला जवळ करत दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र यापुढे कोणत्याही समाजातील नागरिक त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.