नळदुर्ग : येथिल सुपूत्र व पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पुजारी याना अल्पावधीतच महाराष्ट्र शासनाच्या पोलिस दलात साहय्य्क पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाल्याबददल नळदुर्ग येथिल क्रांती ज्योत ॲटो संघटनेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.
      राजकुमार पुजारी यानी सप्टेंबर 2010 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्ष उत्तीर्ण होवुन पोलिस दलात नाशिक नाशिक येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणुन सेवेत दाखल झाले. त्यानंतर नुकतेच नाशिकहुन नांदेड येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणुन त्यांना बढती मिळाली आहे. नांदेड परिक्षेत्रात रुजू होवुन ते पहिल्यादांच आपल्या गावी अल्यानंतर क्रांती ज्योती ॲटो संघटनेच्यावतीने फेटा बांधून पुष्पहार, पुष्पगुच्छ देवुन व पेढा भरवुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष बापू दुरुग्कर, उपाध्यक्ष अरुण्ठाकूर, बाबू शहा, शहामहमद कुरेशी, सय्यद गौस इनामदार, नितीन देडे, सुनिल पिस्के, जगदीश गहीरवार, महादेव वाघमारे, सुभाष पवार, एकनाथ जाधव, शंतनू डुकरे, प्रमोद कांबळे, सुधाकर कनकदार यांच्यासह संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांचा क्रांती ज्योत ॲटो रिक्षा संघटनेच्या सत्कार करताना बापू दुरुगकर, अरुण ठाकूर व इतर
 
Top