उस्मानाबाद :- शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात खत त्वरीत  उपलब्ध व्हावी, त्यांची पिळवणूक होवू नये, चढया भावाने खत बियाणाची विक्रीवर आळा बसावा यासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषदेतर्फे  तालुकास्तरावर 8 व जिल्हा स्तरावर एक असे नऊ भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करण्यात येत आहे तसेच कृषी सेवा केंद्र निहाय कृषी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या समक्ष बियाण व खत विक्री करण्यात येत असल्याचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. 
     कृषी सेवा केंद्रामध्ये जास्तीच्या दराने खत-बियाणे विक्री केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. याशिवाय टोल फ्री क्रमांक 18002334000 वरुन तक्रारी प्राप्त झालेल्या  तक्रारीची  तपासणी करुन त्या निवारण करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.
 
Top