उस्मानाबाद :- यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना विविध कायद्यांची माहिती व्हावी, यासाठी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद आणि माता अहिल्यादेवेी होळकर सामाजिक संस्थेच्या वतीने  नुकतेच वडगाव सिध्देश्वर येथे माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. तसेच कायद्यांची माहिती दर्शविणारे तैलचित्र लावून जनजागृती करण्यात आली.
    जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधिश शशिकांत कुलकर्णी यांनी यावेळी विविध कायद्याची माहिती देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक संस्थेच्या सचिव ॲड विद्या साखरे  यांनी केले. याप्रसंगी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी. बी मोरे, मुख्य न्यायदंडाधिकारी  सी. पी. गडडम यांचीही समयोचित भाषणे झाली.    वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. पाटील, संस्थेचे श्री. सातपूते, ॲड. चादरे, ग्रामस्थ, यात्रेकरु,भावीक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा कुसुम वाघमारे, लक्ष्मीबाई साखरे, मनिष वाघमारे, अरुणा गवई, ज्योति बडेकर, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थींनी परिश्रम घेतले.
 
Top