उस्मानाबाद :- केंद्र  शासनातर्फे ग्रामीण भागातील मुलामुलींना  जवाहर नवोदय  विद्यालयात मोफत शिक्षण देण्यात येते. इ. 6 वी मध्ये प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षा शनिवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी (मा) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या कार्यालयात उपलब्ध होतील, असे प्राचार्य, जवाहर विद्यालय, तुळजापूर यांनी कळविले आहे.  
 
Top