उस्मानाबाद :- जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी मेंदु आवरणदाह मेनिजांयटीस प्रतिबंधक लस दि.10 सप्टेंबर रोजी नर्सिंग ट्रेनिंग सेंटर, जिल्हा रुग्णालय,उस्मानाबाद येथे सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यत देण्यात येणार आहे. यात्रेकरुनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक धाकतोडे यांनी केले आहे.
      हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंनी लस टोचणीसाठी  येताना  रक्त शर्करा तपासणीचा अहवाल, ओळखपत्र वा तत्सम फोटोजन्य पुरावा सोबत आणणे आवश्यक असल्याचे  पत्रकात नमुद करण्यात आले आहे.  
 
Top