उस्मानाबाद - जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद येथील संदेशवाहक तानाजी सुरवसे यांची पदोन्नतीवर लातूर विभागीय माहिती कार्यालय बदली झाल्याने आज त्यांना कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. एका अनौपचारिक कार्यक्रमात  सुरवसे यांचा जिल्हा माहिती अधिकारी  दीपक चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुरवसे यांनी दीर्घकाळ जिल्हा माहिती कार्यालय येथे संदेशवाहक म्हणून सेवा बजावली. आता ते लातूर येथे रोनिओ ऑपरेटर म्हणून रुजू होत आहेत. याप्रसंगी पर्यवेक्षक अर्जून परदेशी, दूरमुद्कचालक अशोक माळगे व शंकर शेळके, सिनेयंत्रचालक अयुब पठाण, वाहनचालक नरहरी गुट्टे व सिद्धेश्वर कोंपले तसेच अनिल वाघमारे, अशोक सुरडकर, शशीकांत पवार आणि श्रीमती चित्रा घोडके यांची उपस्थिती होती.
       यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी श्री. सुरवसे यांनी दीर्घकाळ या कार्यालयात केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला. श्री. सुरवसे यांनीही या कार्यालयातील सहकाऱ्यांकडून वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. सर्वांच्या वतीने सुरवसे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
 
Top