बार्शी –: मराठवाडयातील नांदेड जिल्हयात सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षार्थींच्या फी करीता जिल्हा नियोजन समितीमधून तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल भड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
    बहुतांश विदयार्थी हे ग्रामीण भागातील व हुशार आहेत. अनेकांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडावे लागते व पैशाअभावी स्पर्धेच्या युगात टिकून राहता येत नसल्याने शैक्षिाक फीची तरतुदी करावी. यामुळे होतकरु विदयार्थ्यांना फायदा होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
 
Top