उस्मानाबाद :- शासनाने मासिक वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीतून आहरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या प्रणालीमध्ये आवश्यक ती माहिती भरण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची आवश्यक ती माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी शुक्रवार दि. 6 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथील स्काऊट गाईड कार्यालयाच्या सभागृहात सर्व खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य तसेच संबंधित लिपीकांची कार्यशाळा आयोजन करण्यात आली आहे. सकाळी 11 ते 1 या वेळेत उस्मानाबाद,कळंब,तुळजापूर आणि लोहारा तर दु. 2 ते 5 या वेळेत उमरगा, भूम,परंडा आणि वाशी या तालुक्यासाठी कार्यशाळा होणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
 
Top