उस्मानाबाद :- सन 2012-13 या वर्षातील उस्मानाबाद तालुकास्तरीय पायका ग्रामीण खो-खो स्पर्धेचे आयोजन यापूर्वी दि. 30 सप्टेंबर ते 01 ऑक्टोंबर,2013 या कालावधीत करण्यात आले होते.  परंतू तांत्रिक कारणामुळे या क्रीडा स्पर्धा दि. 7  ते 8 ऑक्टोंबर,2013 रोजी येथील  शरद पवार माध्यमिक विद्यालय, उस्मानाबाद येथे होणार आहेत.  तरी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, क्रीडा शिक्षक, खेळाडु यांनी या बदलेल्या तारखेची नोंद घ्यावी व या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्या संघासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद कार्यालयाच्या वतीने  करण्यात आले आहे. अधिक संपर्कासाठी स्पर्धा प्रमुख तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव (भ्रमणध्वनी क्र.9028095500) यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.                        
 
Top