सोलापूर : केंद्र व राज्य शासन हे सामान्य जनतेसाठी शेकडो-हजारो कल्याणकारी योजना राबवत असते. या योजनांचा गरजू लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचल्या पाहिजेत. यासाठी जिल्हास्तरापासून ग्रामस्तरापर्यंत शासकीय अधिकारी, कर्मचा-याबरोबरच विविध लोकप्रतिनिधींनी प्रभावीपणे अभ्यास करुन समन्वयाने जनतेपर्यंत पोहचवाव्यात असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी यांनी केले.
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे विविध विभाग, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद तसेच पंचयात समिती मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ येथे तीन दिवसीय "भारत निर्माण लोक माहिती" अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आ. प्रा. लक्ष्मण ढोबळे होते.
या योजना सर्व सामान्य जनतेला माहित होण्याकरिता अधिका-यांनी या योजनांची माहिती सोप्या शब्दात जनतेला सांगावी तसेच जनतेनेही विविध योजनांची माहिती अभ्यास करुन घ्यावी असेही श्रीमती डॉ. माळी म्हणाल्या.
यावेळी बोलताना माजी मंत्री प्रा. ढोबळे म्हणाले की, सामान्य जनतेने या योजना समजून घ्याव्यात. त्याचबरोबर आपण कोणत्या योजनेसाठी पात्र ठरतो याचा अभ्यास करावा. तर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात त्या योजनांचा प्रसार व्हावा यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम व जनता एकत्रित येऊन टीमवर्क म्हणून काम केले पाहिजे.
यावेळी माजी आ. राजन पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले. याप्रसंगी पाच कृषी पुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या अभियानासाठी पत्र सूचना कार्यालय व क्षेत्रीय प्रचार निदेशालय यांचे विशेष सहकार्य लाभले असून हे अभियान दि. 25 ते 27 सप्टेंबर या कालावधी मध्ये मोहोळ येथील घाटुळे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. विविध बचत गट, ग्रामसेवक, सरपंच, विद्यार्थी व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाचा लाभ जनतेने मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्र सूचना कार्यालयाचे (पुणे) संचालक प्रशांत पाठराबे तर आभार प्रदर्शन अंकुश चव्हाण यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, तहसिलदार सदाशिव पडदुणे, गटविकास अधिकारी श्री. इंगळे, जिल्हा परिषद कृषी सभापती जालिंदर लांडे, जिल्हा परिषद सदस्या सीमा पाटील, पंचायत समिती सभापती (मोहोळ) भारत गायकवाड, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.