बार्शी : बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांचे वाचन करण्यात आले. स्व.भाऊसाहेब झाडबुके स्‍मारक सभागृहात ही सभा पार पडली यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष कादर तांबोळी यांनी काम पाहिले.
    विरोधी पक्षाच्या वतीने हत्वाच्या ठरविलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहावर गोंधळाची परिस्थिती होण्याची चिन्हे असतांना या विषयाचे तक्रारदार नगरसेवक महेदीमियॉं लांडगे यांनी सभेला गैरहजर राहिल्याने वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
         या विषयावर नगरसेवक बोकेफोडे यांनी बोलतांना भाडे ऐवजी वापरमूल्य असे गोंडस नाव देऊन ठेकेदारास जागा वापरण्यास दिली. सदरच्या २१८.३५ लक्ष खर्चून बांधलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहास घरपट्टी अथवा पाणीपट्टी देखिल नाही हे बेकायदा होते. यावर आपल्यावतीने देण्यात येणार्‍या तक्रारीवरुन तसेच सातत्याने पाठपुरावा केल्यानेच हा विषय सभागृहासमोर आल्याचे म्हटले. सदरच्या बोकेफोडे यांच्या चर्चेवर नागेश अक्कलकोटे यांनी बोलतांना अवांतर चर्चा केल्याचे, नेहमीच्या खोट्या तक्रारी असल्याचे, राजकिय आकसाने बुध्दीभेद करुन बेताल वक्तव्य असल्याचे म्हटले, नगरपरिषदेच्या वतीने सन १९८८ साली यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाला देण्यात आलेल्या जागेस अधिमूल्य काय त्यावेळी विरोधक झोपले होते का? त्यावेळी त्रिसदस्यीय समिती कुठे होती? सदरची बाब आतापर्यंत पटलावर का नाही, सदरच्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहावेळी सांस्कृतिक चळवळ वृध्दींगत होण्याचा हेतू स्पष्ट होता.  सदरचे १९ वर्षे रखडलेले काम वैशिष्ट्यपूवर्ण योजनेतून पूर्ण करुन देखभाल दुरुस्ती होण्यासाठी दोनवेळेस प्रसिध्दीकरण करण्यात आले. यामध्ये भ्रष्टाचाराचा हेतू असता तर मंगल कार्यालय तसेच राजकिय कार्यक्रमासाठी दिले असते. सांस्कृतिक वास्तूंचे वैभव जतन करणे, नव्याने ओळख दृढ होणे गरजेचे आहे. माणसांचा अभ्यास करुन त्यांच्या हृदयापर्यंत पोहचणे समजले पाहिजे. सदरच्या सारख्या विषयावर विरोध करतांना लाख वेळा विचार करणेही गरजेचे होते. वास्तू सांभाळणे अवघड गोष्ट आहे. अनेक शॉपींग सेंटर व नगरपालिकेच्या वास्तू ह्या उपद्रवी लोकांमुळे खराब होत आहेत. यावर कायङ्क कर्मचारी नेमता येत नाहीत, त्याची व्यवस्था ही जिकीरीची गोष्ट आहे, नवीन भरती करता येत नाही, आकृतिबंधाचे धोरण निश्‍चित नाही, वॉचमन, सफाई कर्मचारी, विजेचा खर्च, सततच्या किरकोळ दुरुस्त्या आदी बाबी नगरपरिषदेस परवडणार्‍या नाहीत. सदरच्या विषयी सातत्याने विरोध करुन विरोधकांनी आपल्या पापाचे ङ्खळ म्हणून सांस्कृतिक सभागृह बंद पाडू नये अशी कळकळीची विनंतीही असल्याचे म्हटले.
    दलित वस्ती सुधारणा कामांच्या विषयावर नगरसेवक अशोक बोकेफोडे यांनी आक्षेप घेत दलितांच्या संख्येवरुनच दलित वस्ती सङ्कजण्यात यावी व ज्या भागात लोकवस्ती कमी प्रमाणात असेल त्या ठिकाणी हा निधी खर्च करुन नये असे ङ्कत व्यक्त केले. यावर बोलतांना नगरसेवक अक्कलकोटे यांनी सदरचा विरोध हा गैरवाजवी असल्याचे व सोयीचा अर्थ लावण्यात येऊ नये असे म्हटले.
 
Top