मुंबई -: देवदासींच्या कल्याणाचे काम करणाऱ्या दिवंगत लताबाई सकट यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यासाठी 12-13 व 13-14 या दोन्ही वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
वैयक्तिक पुरस्काराचे स्वरुप
देवदासी प्रथा निर्मूलन व देवदासींचे पुनर्वसन या क्षेत्रात नवीन देवदासी होण्यापासून प्रतिबंध, धार्मिक कृती, समारंभ रोखण्यासाठी, किंवा समारंभ पार पाडण्यास भाग घेण्याऱ्या विरुध्द किंवा त्यास अप-प्रेरणा देणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्यासाठी पोलीसांची मदत घेऊन दाखल केलेले गुन्हे, सुटका केलेल्या महिला, मुलींना आश्रयगृह इ.मध्ये ठेऊन केलेले पुनर्वसन या क्षेत्रात किमान 5 वर्ष व त्या पेक्षा जास्त वर्षे भरीव कार्य केलेल्या व्यक्तिस रु. 1,00,000 व सन्मान चिन्ह या स्वरुपांमध्ये हा पुरस्कार देण्यात येईल.
स्वंयसेवी संस्थांसाठी पुरस्काराचे स्वरुप
देवदासी प्रथा निर्मूलन व देवदासींचे पुनर्वसन या क्षेत्रात नवीन देवदासी होण्यापासून प्रतिबंधात्मक केलेले काम धार्मिक कृती, समारंभ रोखण्यासाठी किंवा पार पाडण्यास भाग घेणाऱ्या विरुध्द किंवा त्यास अप-प्रेरणा देणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्यासाठी पोलिसांची मदत घेऊन दाखल केलेले गुन्हे, अशा देवदासी समर्पणातून सुटका केलेल्या महिला, मुलींना आश्रयगृह इ. मध्ये ठेऊन त्यांचे पुनर्वसन, त्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व/ ओळख संपवून मुख्य प्रवाहात आणून सर्व साधारण स्त्रीयांप्रमाणे जगण्यासाठी केलेले व्यावसायिक प्रशिक्षणव पुनर्वसनासाठी कार्य या क्षेत्रात किमान पाच वर्षै वा अधिक वर्षे भरीव कार्य केलेल्या दोन स्वंयसेवी संस्थांना रुपये 50 हजार व सन्मान चिन्ह या स्वरुपांमध्ये हा पुरस्कार देण्यात येईल.
इच्छुक व्यक्ती अथवा संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालय, 117, बीडीडी चाळ, डॉ. आंबेडकर वसतीगृहांच्या आवारात, वरळी, मुंबई 400018. दूरध्वनी क्रमांक 022-24922484 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.