नवी दिल्ली :- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची अखेर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आज अधिकृत घोषणा करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची नाराजी पत्करत भाजपने हा निर्णय घेतला असल्याने मोदी जिंकले, अडवाणी हरले असेच म्हणावे लागेल. परंतु, या निर्णयामुळे भाजपचा एक मोठा गट मोदी विरोधात काम करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपमधून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पहिल्यापासूनच विरोध राहिला आहे. आजही त्यांचा विरोध कायम होता. नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यासाठी आधी साडेचार वाजताची वेळ देण्यात आली होती. मात्र ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची नाराजी दूर करण्याचा एक प्रयत्न म्हणून पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीच लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये शेवटपर्यंत यश आलं नाही. लालकृष्ण अडवाणी यांच्या अनुपस्थितीत नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आली.
गांधीनगरहून नरेंद्र मोदी यांचं दिल्लीत आगमन झाल्यावर दिल्लीत त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि ढोल-ताशे वाजवून त्याचं स्वागत केलं. दिल्लीत नरेंद्र मोदींच्या समर्थकांनी केलेली तयारी 2014 च्या लोकसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखालीच होणार असल्याच्या निदर्शक होत्या.
यापूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनं मोदी यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे एनडीएतील एक महत्वाच्या घटक पक्षाला आपल्या सोबत घेण्यात मोदींना यश आलंय.
भाजप पक्षश्रेष्ठींनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा करण्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ समजल्या जाणाऱ्या 12 नेत्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या बैठकीला भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, मुरली मनोहर जोशी यांचीही उपस्थिती होती.
नरेंद्र मोदींच्या निवडीला लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणेच सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी यांचाही विरोध असल्याचं कळतं, मात्र सध्या तरी त्यांनी आपले आक्षेप नोंदवत पक्षातल्या बहुमतासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.