नळदुर्ग -: सर्वत्र गौरी-गणपतीचा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठया भक्तीमय व उत्साही वातावरणात गौरीची प्रतिष्ठापना करुन विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली.
सर्वत्र मोठया उत्साहात जेष्ठा-कनिष्ठा गौरीचे सोनपावलाने आगमन झाले. गणपतीपाठोपाठ महालक्ष्मीचे आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचे धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. दहिटणा (ता. तुळजापूर) या छोटयाशा गावात विजयकुमार पाटील यांच्या घरी मोठया उत्साहाने गौरी-गणपतीचा सण साजरा करण्यात आला. नोकरीनिमित्त बाहेर गावी असणारे गावातील बहुतांश नागरीक खास या सणासाठी एकत्रित आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत होते. त्यापैकी नोकरीनिमित्त उस्मानाबाद येथे वास्तवास असणारे विजयकुमार पाटील, त्यांचे बंधू डॉ. सचिन पाटील सोलापूर येथे वास्तव्यास असून ते खास या सणानिमित्त आपल्या दहिटणा या गावी वयोवृध्द मात्या-पित्यांसमवेत लक्ष्मीचा सण उत्साहात साजरा केला. याप्रसंगी नातेवाईक, मित्र परिवारांसह कुटुंबियातील सर्व सदस्य उपस्थित होते.