उस्मानाबाद :- राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत राज्याच्या ग्रामिण भागामध्ये मांसल कुक्कुटपक्षी़ कुक्कुट पालन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयात 50 टक्के अनुदानावर एक हजार मांसल कुक्कुटपक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय जिल्हयात सन 2013-14 मध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त एस. एस. भोसले यांनी केले आहे.
कुक्कुट संगोपन,पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रस्ताव दाखल करावयाची अंतिम तारीख 29 सप्टेंबर, 2013 आहे. या योजनेमध्ये पक्षीगृह, स्टोअर रुम. पाण्याची टाकी, निवासाची सोय, विद्युतीकरण, उपकरणे, खाद्याची, पाण्याची भांडी इ. बाबीसाठी खर्च करण्यात येणार असून एका गटाची किंमत रु 2 लाख पंचवीस हजार इतकी आहे.या योजनेमध्ये सर्व प्रवर्गातील लाभार्थींना 50 टक्के म्हणजेच रु. 1 लाख 12 हजार 500 शासकीय अनुदान देय राहील व उर्वरीत रक्कम 50 टक्के म्हणजेच रु. 1 लाख 12 हजार 500 लाभार्थीना स्वत: अथवा बॅक/ वित्तीय संस्थेकडून कर्ज घेवून व्यवसाय उभारावयाचे आहे.
या योजनेतून जिल्हयातून लाभार्थी 43 निवडण्यात येणार असून लाभार्थ्यांची निवड निकष शासन निर्णयानुसार खालील प्राधान्यक्रमानुसार करण्यात येणार आहे. अत्यल्प भुधारक शेतकरी 1 हेक्टर पर्यंतचे भूधारक, अल्प भूधारक शेतकरी 1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक, सुशिक्षीत बेरोजगार रोजगार केंद्र नांव नोंद केलेले, महिला बचत गटातील लाभार्थी / वैयक्तीक महिला लाभार्थी अ.क्र. 1 ते 3 मधील लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.
प्रकल्प समाविष्ट बाबी व प्रकल्प मुल्याधारीत अनुदानाव्यतीरीक्त लाभार्थींनी एक हजार मांसल पक्षाच्या संगोपनासाठी येणारा खर्च स्वत: करावयाचा असून शेडचा उपयोग केवळ कुक्कुट पालन व्यवसायांतर्गत पक्षी संगेापनासाठी करणे बंधकारक राहील.
सदर योजनेच्या संपुर्ण माहितीसाठी नजीकच्या पशुवैधकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे संपुर्ण माहिती करुन घेवून परिपुर्ण अर्ज संबधीत संस्थेत दाखल करावेत. सदरची योजना शासनाच्या व खात्याच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात येणार आहे. या योजनेखालील अर्ज नजिकच्या पशुवैधकीय संथेमध्ये दाखल करावेत.