उस्मानाबाद -: राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर,2013 या कालावधीत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकांसाठी मतदार यादी सुधारीत कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
    यानुसार सार्वत्रिक निवडणूक- उमरगा तालुक्यातील येळी येथील सर्व प्रभाग क्रमांक, परंडा तालुक्यातील खासगावातील सर्व प्रभाग क्रमांक, पोटनिवडणूक- तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर तीन प्रभाग क्रमांकात, तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे  1 प्रभाग क्रमांक, तर कळंब तालुक्यातील कोथळा येथील 3 प्रभाग क्रमांकात पोटनिवडणूका होणार आहेत.
    मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक १ सप्टेंपर २०१३ हा होता. मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 3 चे पोटनियम 4 नुसार प्रारुप मतदार यादी लोकांच्या परीक्षणासाठी उपलब्ध करणे आणि हरकती सूचना मागविण्याचा दिनांक ११ सप्टेंबर ही होती. हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक सोमवार, दि. 16 सप्टेंबर.  मुंबई ग्रामपंचायत निवडणूक  1959 मधील नियम 3 चे पोटनियम 5 नुसार मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करणे व अंतिम यादी  दि.  24 सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तरी सबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.    
 
Top