रुपया म्हणाला अन्न आणि सोन्याला
तुमच्यामुळे माझी पत
अशी काही कोसळली
उरली सुरली अब्रुही
महागाईने मातीत मिसळली


खिन्न होऊन अन्न म्हणाले,
इतके दिवस मं
त्र्यांनी मला
सडवून सडवून मारलं आहे
माझं तर अस्तित्व फक्त
दारु (वाईन) पुरतं उरलं आहे


उजळलेले सोने म्हणाले,

अर्ध्या हाळकुंडात पिवळं होऊन
भारतीयांनी मला चढवलं आहे
मला सांभाळता सांभाळता मित्रांनो
स्वत:च्या सुखशांतीला बिघडवलं आहे

- भगवंत सुरवसे
मो. 9763830982
 
Top