बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) –: एकादशीनिमित्त भगवंताचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या वृध्द महिलेची हातोहात फसवणूक करुन सहा तोळे सोने घेऊन दोन चोरटे मोटासायकलस्वार फरार झाले आहे. सदरची घटना शहरातील मध्यवस्तीत घडल्याने पुन्हा एकदा अंगावर सोने धारण करणा-या महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शारदा मल्लिकार्जून चिपडे (वय 25 वर्षे, रा. सौंदरे, ता. बार्शी) असे फसगत झालेल्या महिलेचे नाव असून आज रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास भगवंताचे दर्शन घेण्यासाठी त्या बार्शीत आल्या. ग्रामदैवत श्री भगवंताचे दर्शन घेऊन महाद्वार चौकाजवळ सफरचंद घेऊन पुढे सरळ आयडीबीआय बँकेपर्यंत आल्यानंतर एका रिक्षावाल्याने त्या महिलेस हाक मारुन कोणीतरी साहेब आपल्याला बोलावत असल्याचे सांगितले. रिक्षावाल्याने हात केलेल्या दिशेने पाहून आपल्याला कोण बोलावत आहे, ते पाहण्यासाठी शारदा चिपड यांनी त्या दोन अनोळखी व्यक्तीकडे जात कशाला हाक मारता म्हणून विचारल्यावर त्यांनी आत्ताच सोन्यासाठी एका महिलेचा खून झाला असून आपण कशाला सोने अंगावर घालून जात आहात, ते सोने काढून नीट ठेवा, असे म्हणत एक कापड समोर केले. या कापडात आपले सोने ठेवा म्हणून अंगावरील दोन पाटल्या व अंगठी काढून घेत कापडात गुंडाळल्यासारखे करत त्या महिलेच्या हाती ठेवले व तिथून फरार झाले. दोघेजण पटकन निघून गेल्याने कापडात काय आहे, ते पाहिल्यावर लोखंडी तारांचे वेटोळे दिसून आल्याने व आपली फसवणूक झाल्याने त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. परंतु तोपर्यंत चोरटयांची वेगाने पळून जाण्यात यश मिळविले. सदरच्या अनोळखी इसमांचे अंदाजे वय एकाचे 25 ते 30 तर दुस-याचे 40 ते 45 असे असल्याचे फसवणूक झालेल्या चिपडे यांनी पोलिसांना सांगितले. सदरच्या तक्रारीवरुन बार्शी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक डोके हे करीत आहेत.
दरम्यान बार्शी शहरात विविध प्रकारच्या बतावण्या करुन सातत्याने शेकडो लोकांची फसवणूक होत असल्याने महिलांच्या दागिने चो-यांचे प्रकार नियमित झाले आहेत. अनेक प्रकरणात फिर्यादी गोंधळलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली जात नाही. त्या गोष्टीचा गैरुायदा घेऊन चोरटे आपले हात साफ करत आहेत. बार्शी शहराच्या लोकवस्तीचा संख्येवरुन व पोलिसांच्या संख्येवरुन चोरटयांना बार्शी हे अत्यंत चांगल्या प्रकारचे पोषक वातावरण असल्याचा विश्वास असल्याने अशा घटना सतत होत आहेत.