कळंब (भिकाजी जाधव) -: वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे सिमेंट बंधा-याचा गाळ काढून जमशेदजी टाटा ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्यातून व दिलासा संस्था यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्याय संस्था हासेगाव (केज) यांनी डोह मॉडेल तयार केले आहे. दहा फुट खोल, पस्तीस फुट रुंद, आणि अडीचशे फुट लांबीचा हा डोह आह. आज रोजी येथे दीड कोटी लिटर पाणी साठले आहे. याचा जनावरांना पाणी पिण्यासाठी वापर होत आहे. संस्थेच्या या कामाचे तांदुळवाडी ग्रामस्थाकडून अभिनंदन केले जात आहे.