बार्शी -: शहरातील अनेक परंपरागत सार्वजनिक गणेश मंडळाच्या स्थापनेच्या मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी श्री गणेशाचे विविध वादयांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
     बार्शी शहरात सुमारे 90 ते 100 सार्वजनिक असून यात मोठी सुमारे पंधरा मंडळे आहेत. दाणे गल्ली, विघ्नहर्ता, सामाजिक एकता, जय हनुमान, वाडिया राज, इंडस्ट्रीयल इस्टेट, साई प्रतिष्ठाण, पाषाण ग्रुप, काळा मारोती, बाळ मोरया, भगवंत पंप, याराना आदी 15 मंडळांच्या प्रतिष्ठापना मिरवणुका निघाल्या.
गणेशोत्सव काळाकरीता सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेसाठी बार्शी पोलिसात 122 पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. सातत्याने भांडण तंटयातील कारवायात असणा-यांवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच दारुबंदीचा कायदा मोडणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतुकीची शिस्त मोडण-यांना समज देऊन विविध वाहनांतुन महिलांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या.
 
Top