![]() |
राजा कंपनी गणेश मंडळ तुळजापूर |
उस्मानाबाद : जिल्हयात सर्वत्र सोमवार रोजी सकाळपासूनच सर्वांनीच भक्तीमय वातावरणात मोठया उत्साहाने श्री गणरायाचे स्वागत केले. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी "बाप्पा मोरया, बाप्पा मोरया" च्या जयघोषात सवादय मिरवणुकीने, गुलालाची मुक्त उधळण करीत "श्री" ची प्रतिष्ठापना केली. यावेळी गणरायाचे वरुणराजासोबत आगमन झाल्याने सर्वत्र आंनदाचे वातावरण निर्माण झाले.
वर्षातून एकदा येणारा गणेशोत्सव हा बालचमूसह थोरामोठय़ांनाही जणू एक आनंदाची मोठी पर्वणीच होय. सोमवारच्या चतुर्थी दिवशी सकाळपासूनच "श्री" च्या आगमनाची सर्व गणेश भक्तांनी आपआपल्या परीने जय्यत तयारी सर्वत्र करताना दिसत होते. उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, कळंब, भूम, परंडा, वाशी, लोहारा यासह जिल्हयातील गावागावात असलेल्या छोटयामोठया बाजारपेठेत गणेशाची मुर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकीने व मोठया भक्तीमय वातावरण श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
तुळजापूर
तुळजापूर शहरात मोठया उत्साहाने श्री गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच बालगोपाळांनी तसेच शहरातील विविध गणेश मंडळांनी "श्री" च्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. दुपारी दोनच्या सुमारास तुळजापूरात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहरातील राजा कंपनीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना रविवारी मध्यरात्री करण्यात आली. या गणपतीची मूर्ती चलमूर्ती असल्याने मंदिरातून मुर्ती गणेशोत्सव मंडळात नेण्यात आली. या मंडपात ही मूर्ती दहा दिवसांसाठी असणार आहे. शहरातील जवळपास चाळीस गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली असून नृसिंह गणेश मंडळाने भव्य मिरवणुकीने गणेशाची प्रतिष्ठापना केली. तुळजाभवानी पुजारी मंडळातही "श्री" ची प्रतिष्ठापना पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्षा विदयाताई गंगणे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांच्यासह अन्य सदस्यांच्या उपस्थितीत मोठया मंगलमय वातावरणात करण्यात आली. गणेशोत्सव काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घागरे व पोलीस निरीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उमरगा
उमरगा शहरातील राष्ट्रीय महामार्ग तसेच इंदिराचौक, पतंगे रोड, शिवाजी चौक, आरोग्य नगरी, महादेव गल्ली आदी भागातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यात शहरातील विविध गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता.
भूम
उत्साही वातावरणात व शांततेत व मंगलमय वातावरणात मिरवणुका काढून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी घरा-घरात गणेशाचे आगमन झाले. मोठय़ा गणेश मंडळांनी दुपारपासूनच ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत केले. शहरातील न. प. चौकात गणेशमुर्तीचे स्टॉल होते. त्या ठिकाणाहून विविध भागात गणेशाची मिरवणूक निघाली.
परंडा
परंडा येथील मुख्य मंगळवार पेठ, आगरकर गल्ली, समतानगर, राजापुरा गल्ली, कुराड गल्ली, सोमवार पेठ आदी विविध भागातून गणेशाची मिरवणूक निघाली. काही गणेश मंडळांनी सायंकाळी रोषणाईसह मिरवणूक काढली. शहरात लहान मोठी सुमारे २00 हून अधिक गणेश मंडळे यंदा स्थापन झाली आहेत.
वाशी
वाशी शहरातील शिवाजी रोडवरुन वाजत गाजत व गुलालाची उधळण करत मिरवणूका काढून गणरायांचे स्वागत करण्यात आले. गणेशाचे आगमन होणार म्हणून सकाळपासून सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात ट्रॅक्टरवरुन मिरवणूका काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.