उस्मानाबाद :- लेडिज क्लब उस्मानाबाद यांच्या वतीने १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव २0१३ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच महिलांसाठी विविध स्पर्धांही घेण्यात येणार असल्याचे क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी सांगितले. १२ व १३ सप्टेंबर रोजी गौरी-गणपती देखावा स्पर्धा आयोजिण्यात आली असून, १४ सप्टेंबर रोजी ७ ते १५ वयोगटातील मुलींसाठी व १५ वर्षाच्या पुढील युवतींसाठी ‘एकापेक्षा एक.अप्सरा आली’ ही नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. १५ सप्टेंबर रोजी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ठष्ट’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. लेडिज क्लबवर फक्त महिलांसाठी सायंकाळी ५ वाजता हे नाटक होणार असून, यासाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. १६ रोजी खास सासू-सुनांसाठी ‘तुझं नि माझं जमेना’ ही स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. याअंतर्गत सुनेसाठी पैठणी तर सासूसाठी नथ बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. १७ रोजी नाच गं घुमा.जागरं मंगळा गौरीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, यातील विजेत्यांना दहा हजाराचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहितीही अर्चनाताई यांनी दिली.
 
Top