बीड (सोमनाथ खताळ) -: भ्रष्टाचार टाळा, देश मजबुत करा, लोभी भ्रष्टाचारी व्यक्तीस धडा शिकवा, हा दक्षता जनजागृती सप्ताह संपुर्ण बीड जिल्ह्यात राबवण्यात आला. तरीही सर्वत्र भ्रष्टाचार करणा-या बड्या अधिका-यांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. चालु वर्षात बीडच्या प्रतिबंधक पथकाने विविध कामे करण्यासाठी सर्वसामान्यांकडुन लाच घेताना आठ महिन्यात तब्बल पंधरा कारवाया केल्या आहेत.
या पंधरा कारवाया मध्ये तीन क्लासवन, दोन क्लास टु या बड्या अधिका-यांचाही समावेश आहे. एवढेच नाही तर शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या दोन फौजदारांसह अंमळनेरच्या एका हवालदाराला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. या पथकामध्ये उप अधिक्षक हरिष खेडकर यांच्यासह पोलिस निरीक्षक विनय बहिर, पोहेकॉ श्रीराम खटावकर, पोहेकॉ विष्णु मिसाळ, पोलिस नाईक रमेश पिसाळ, बापु बनसोडे, राकेश ठाकुर, संदिप गिराम, प्रविण रसाळ, शिवाजी खवतड आदींचा समावेश होता.

असे आहेत ते पंधरा लाचखोर
१) केंद्रे (तलाठी नागापुर ता. परळी)
२) शिरोदे (फौजदार शिवाजी नगर पोलिस ठाणे, बीड)
३) गंगाधर पाटील (क्लास वन अधिकारी)
४) धमाट (ग्रामसेवक चोपनवाडी ता. माजलगाव)
५) वेदपाठक (तलाठी अंजनडोह ता. धारुर)
६) अनिता पवार (ग्रामसेवक शेलापुरी ता. माजलगाव)
७) रामेश्वर चांडक (कृषी अधिकारी तथा जिल्हा गुण नियंत्रक परिक्षक )
८) राजश्री पांडव, साहेबराव मुंडे (भुमी अभिलेख कार्यालय, धारुर)
९) मधुकर तांदळे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्लास टु)
१०) चंद्रकांत चौदंते (सहाय्यक सरकारी अभियुक्ता क्लास टु)
११) बाबासाहेब बागलाने (सेवानिवृत्त तलाठी, खाजगी व्यक्ती तहसील कार्यालय, बीड)
१२) भास्कर कंठाळे (ए.एस.आय. शिवाजी नगर पोलिस ठाणे, बीड)
१३) गणेश कदम (पोहेकॉ पोलिस ठाणे, अंमळनेर)
१४) शिला काळे (तलाठी), रवि काळे (खाजगी व्यक्ती), नेकनुर ता. बीड
१५) चंद्रसेन सुरवसे (क्लास टु अधिकारी, वनविभाग बीड)
प्रतिक्रिया
थेट आमच्याशी संपर्क साधा :- कोणी अधिकारी आपल्याकडुन लाच मागत असेल तर आपण कोणालाही न घाबरता थेट लाचलुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधावा. प्रत्येक शासकीय कार्यालयात, सार्वजनीक ठिकाणी कार्यालयाचा पत्ता व दुरध्वनी फलक लावलेले आहेत. आपण दिलेल्या तक्रारीची आम्ही नक्कीच दखल घेऊन लाचखोर कर्मचा-याला धडा शिकवु.
- हरिष खेडकर (पोलिस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक पथक, बीड)
तक्रार देणे आवश्यक -: तुम्हाला जर कोणी एखादा कोणत्याही विभागातील-क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी लाच मागत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधुन सविस्तर तक्रार द्या. आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेऊन त्या लाचखोर अधिका-याला सापळा रचुन जाळ्यात ओढु.
श्रीराम खटावकर (कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक पथक, बीड)