बीड (सोमनाथ खताळ) -: मराठवाडा साहित्‍य परिषदेच्‍यावतीने दिल्‍या जाणा-या आदर्श शिक्षक पुरस्‍कार यावर्षी ब्रम्‍हवाडी (ता. परळी) येथील कृतिशील शिक्षक सौदागर आबाजी कांदे यांना माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्‍तापल्‍ले यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आला. अत्‍यंत प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेऊन विदयार्थी घडविण्‍याचे काम कांदे यांच्‍याकडून केले जात असल्‍याने त्‍यांची या पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली.
        मराठवाडा साहित्‍य परिषदेच्‍यावतीने दरवर्षी कृतीशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात येते. यावर्षीही अकरा शिक्षकांची निवड करण्‍यात आल्‍यानंतर मराठवाडा विदयापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्‍तापल्‍ले यांच्‍या उपस्थितीत या शिक्षकांना पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. सौदागर कांदे हे मागील वीस वर्षापासून ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. ब्रम्‍हवाडी येथील जिल्‍हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्‍या कांदे यांनी विदयार्थ्‍यांना स्‍पर्धा परीक्षेत मार्गदर्शनाबरोबरच विविध उपक्रम राबवले. त्‍यांच्‍या या कार्याची दखल घेऊन त्‍यांची निवड करुन त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले.
 
Top