नळदुर्ग -: मुर्टा (ता. तुळजापूर) ग्रामपंचायत व कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मांतर्गत महिला व शेतक-यांसाठी शेती अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीस नळदुर्ग येथील गोलाई येथून प्रारंभ झाला. या अभ्यास सहलीस पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करुन महिला शेतक-यांना शुभेच्छा दिल्या.
तुळजापूर तालुक्यातील यात मुर्टा, आलियाबाद, मानमोडी, आसपासच्या गावातील सुमारे 300 महिला शेतकरी या सहलीत सहभागी झाले असून ही सहल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, हिवरेबाजार, राळेगणसिध्दी, बाभळेश्वर या गावातील प्रकल्पास भेट देवून तेथील पशुधन संगोपन, कृषी तंत्रज्ञान, पाणलोट क्षेत्र विकास, जलसंधारणाची माहिती घेणार आहेत. हा अभ्यास दौरा तीन दिवसाचा आहे. पाणी आडवा पाणी जिरवा, 100 टक्के शौचालय, कमी पावसात पीके घेण्याची पध्दत आदि कृषी विभागाची माहिती घेणार आहेत.
याप्रसंगी सुजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनिल चव्हाण, जि. प. सदस्य, भद्राताई मुळे, दिलीप सोमवंशी, मुर्टा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यवान सुरवसे, प्रकाश भोसले, तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधव, व्ही. व्ही. पाटील, पी. व्ही. कुलकर्णी, डी. पी. बिराजदार यांच्यासह लोकप्रतिनिधी, शेतकरी, महिला, बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.