उस्मानाबाद -: लोकमंगल प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून 28 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद शहरातील पोलिस कवायत मैदानावर हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संचालक रामराजे पाटील यांची उपस्थिती होती. विवाहबध्द होणार्या दाम्पत्यांसाठी कपडे, शाल-फेटा, वधूला मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. तसेच दाम्पत्याचा विमा उतरविण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.
लोकमंगल प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणार्यांपैकी शैक्षणिक तसेच कामाची पात्रता तपासून दाम्पत्यांना लोकमंगल उद्योग समूहामध्ये नोकरी देण्यात येत आहे, असे रोहन देशमुख यांनी सांगितले. आतापर्यंत 1500 जोडपी विवाहबध्द झाली असून, त्यापैकी 44 जणांना नोकरी दिली आहे. इच्छुकांनी लोकमंगल मल्टी स्टेटच्या नजिकच्या शाखेत नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.