उस्मानाबाद :- प्रत्येक नागरिकाचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. संतुलित औद्योगिक विकास, सुनियोजित नागरीकरण, दर्जेदार शिक्षण, कोरडवाहू शेतीचे शाश्वतीकरण आणि पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात ही विकासाची पंचसूत्री राज्य शासनाने आखली आहे. प्रत्येक जबाबदार नागरिकाने या विकासाच्या कामात योगदान देणे महत्वाचे आहे. सर्वांच्या सहकार्यानेच आपण ही परिस्थिती बदलू शकू, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 65 व्या वर्धापनदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना उद्देशून भाषण करताना ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी हुतात्मा स्तंभास स्मृतीचक्र अर्पण करुन अभिवादन केले. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॅा. सुभाष व्हट्टे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, जिल्हा स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे अध्यक्ष श्री. माने यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, हैद्राबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्याच्या लढ्यात आपल्या जिल्ह्याचा मोठा सहभाग राहिला आहे. आपल्या जिल्ह्यातील काही गावांनी या निजामी राजवटीविरोधात संघर्ष करताना अनेक हालअपेष्टा सोसल्या. त्या गावकऱ्यांची आणि त्यांच्या कष्टांची आपण कृतज्ञतेने आठवण ठेवली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
यंदा आपल्या जिल्ह्यात आजवर केवळ 505 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याचे नमूद करुन सलग दोन वर्षे कमी पावसामुळे जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. मात्र, जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत असले तरी यावर्षीही अपुऱ्या पावसाचे संकट आपल्यापुढे आहे. त्यामुळे उपलब्ध होणारे पाणी जपून वापरणे, पाण्याचा पुनर्वापर आणि पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्य शासन जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. सर्वांना आरोग्य सुविधा पुरविणारी राजीव गांधी जीवनदायी योजना, मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सुकन्या योजना याशिवाय येत्या 2 आक्टोबरपासून पीडित महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजना राबविण्यात येणार आहे. समाजातील जादूटोणा, अनिष्ट रुढीस अघोरी विद्या यांना आळा घालण्यासाठी वटहुकूम राज्य शासनाने नुकताच जारी केला आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाला हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर्षी कृषीपंपाच्या वीजबिलाबाबत शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन प्रलंबित बिलांपैकी पहिले बिल भरल्यास जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाने नुकतेच अन्न सुरक्षा विधेयक मंजूर केले आहे. त्याचा थेट लाभही समाजातील विविध घटकांना होणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
यावेळी जि.प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे, लक्ष्मण सरडे, जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती आदि लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसह जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपजिल्हाधिकारी सर्वश्री बी. एस. चाकूरकर, के. ए. तडवी, शिल्पा करमरकर, संतोष राऊत, तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी , स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचन हनमंत पडवळ यांनी केले.
दरम्यान, येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.